Marathi Biodata Maker

जळगावमध्ये ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर दगडफेक; निवडून आलेल्या सरपंचाच्या भावाचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 20 डिसेंबर 2022 (21:49 IST)
जळगाव – जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द गावात ग्रामपंचायत निवडणुकीतील निकालानंतर झालेल्या दगडफेकीत विजयी उमेदवाराच्या भावाचा मृत्यू झाला. धनराज श्रीराम माळी असे मृत झालेल्याचे नाव आहे. या निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर विजयी व पराभूत असे दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत दगडफेक करणा-या २५ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे. या घटनेने गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून मोठी खळबळ उडाली आहे. या निवडणुकीत धनराज माळी यांचा भाऊ जितेंद्र माळी यांचा विजय झाला. विजयी झाल्यानंतर ते गावातील देवीच्या मंदिरावर दर्शन घेण्यासाठी जात असतांना पराभूत पॅनलच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यात काही जणांनी लाठ्या काठ्या हल्ला केला. या हल्ल्यात धनराज माळी यांच्या डोक्यात दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. पण, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

बीएमसी अधिकारी असल्याचे भासवून पैसे उकळल्याप्रकरणी एकाला अटक, तिघांवर गुन्हा दाखल

दिल्ली एमसीडी पोटनिवडणुकीचे निकाल; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या वॉर्डमध्ये भाजपचा विजय

LIVE: आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले

हार्दिक पंड्या महेंद्रसिंग धोनीच्या खास क्लबमध्ये सामील, टी-२० क्रिकेटमध्ये केली अनोखी कामगिरी

नागपूर जिल्ह्यातील पेंच अभयारण्यात मृत अवस्थेत वाघ आढळला

पुढील लेख
Show comments