सोमवारी संध्याकाळी अकोला शहरामध्ये किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. यामुळे, दोन्ही गटांमध्ये दगडफेक झाली. तसेच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार अकोला जुने शहर परिसरात किरकोळ कारणावरून सोमवारी सायंकाळी दोन गटात हाणामारी झाली. यामुळे, दोन्ही गटांमध्ये दगडफेक झाली. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. व कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.
जुने शहरातील हरिहर पेठ परिसरात सोमवारी संध्याकाळी दोन गटात वाद झाला. या वेळी झालेल्या दगडफेकीत अनेक नागरिक जखमी झाले. घटनास्थळी रस्त्यावर दगड, विटा दिसून आल्या.तसेच काही वाहने देखील जाळण्यात आली. यामध्ये एक ऑटोरिक्षा आणि एका दुचाकीचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. व घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दगडफेकीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तसेच , जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याची माहिती मिळाली आहे.