Marathi Biodata Maker

मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने विद्यार्थ्याने आत्महत्या केली

Webdunia
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (09:01 IST)
ऑनलाईन शिक्षण घेताना मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने विपुल पवार (१७) विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बुबळी गावात घडली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या शाळा, महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. मात्र, या पध्दतीचा विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेताना मोबाईल नेटवर्कचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, दुसरीकडे ग्रामीण भागातील दुर्गम भागात विद्यार्थ्यांना मोबाईल नेटवर्क शोधण्यासाठी डोंगरावर, झाडावर, टेकडीवर जावे लागत आहे .
 
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील बाबुळी गावात राहणार विपूल पवारहा विद्यार्थी १२ वीत शिकत होता. सध्या कोरोना काळात सुरू असलेल्या केंद्रीय विद्यालयाने ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करत डिजिटल शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. मात्र गावात मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने त्याचे शाळेचे तास बुडत होते. यामुळे तो मागील १५ दिवसांपासून तणावात होता. त्यामुळे २ ऑगस्टला मध्यरात्री एक ते दिड वाजण्याच्या सुमारास विपूलने घराच्या मागच्या बाजूस असलेल्या शेवग्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. विपुल हा अतिशय हुशार मुलगा होता.याप्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

१३ बैठका आणि सीसीटीव्ही फुटेजचा कच्चा रेकॉर्ड...राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर रोहित पवारांचा खळबळजनक दावा

प्रचंड गर्दीमुळे शिवनेरी किल्ल्यावर चेंगराचेंगरी; अरुंद मार्गात लोक अडकले

लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात बुरखा घालून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला अटक

रोहित पवार यांच्या 'षड्यंत्र'च्या दाव्यांवर विमान वाहतूक मंत्रालय संतापले; मंत्री राम मोहन नायडू यांनी आरोपांना निराधार म्हटले

LIVE: रोहित पवार यांच्या 'षड्यंत्र'च्या दाव्यांमुळे विमान वाहतूक मंत्रालय संतापले

पुढील लेख
Show comments