Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Video विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टर पलटी

Student's tractor overturned
, शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (14:32 IST)
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात एक घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसवून दर्यापूर जात असलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टर पलटी झाल्याने 22 विद्यार्थी जखमी झाले.
 
मिळालेल्या माहितीनुसार जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर जैनपूर येथे सुरू होते तसेच शिबीराचा समारोप झाल्यानंतर चक्क विद्यार्थ्यांना एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसवून दर्यापूर घेऊन जात असताना अपघात झाला. वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली पलटी झाली व यात 22 विद्यार्थी जखमी झाले. अपघातातील दोघा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवरीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, मेव्हणीशी लग्न लावून दिले