rashifal-2026

आदेश दिला की एक तासही सत्तेत न राहता राजीनामा देऊ :देसाई

Webdunia
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (08:46 IST)

शिवसेना २०१९ ची लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे, ही काळ्या दगडावरील भगवी रेघ आहे. पक्षाने आदेश दिला की, शिवसेनेचे सर्व मंत्री एक दिवस काय, एक तासही सत्तेत न राहता राजीनामा देतील, असा विश्‍वास शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी  व्यक्त केला आहे.   चिंचवड येथील लघुउद्योजकांच्या प्रदर्शनानिमित्त आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते. 

देसाई म्हणाले की, राजीनामा देण्याबाबत पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल. सरकारच्या कामगिरीबद्दल ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारला तीन वर्षे झाली आहेत. यामध्ये प्रयत्न नक्की झाले आहेत; परंतु सगळे समाधानी आहेत, असे म्हणता येत नाही. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकर्‍यांचा संपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेची मागणी होती, ती अद्याप पूर्ण झालेली नाही. काही गोष्टींत त्यांनी प्रयत्न केले असून, त्यामध्ये त्यांना यश यावे, या शुभेच्छा आहेत असे सांगितले आहे. 

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

मोदी सरकार राहुल गांधींना घाबरतात संजय राऊत यांचा मोदींवर घणाघात

ठाण्यातील भिवंडीत 13 वर्षीय अपंग मुलीवर अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

सावधान! आता 'आई-बहिणीवरून' शिवी दिली तर खिशाला बसणार ५०० रुपयांचा कात्री; महाराष्ट्रातील एका ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय!

पुढील लेख
Show comments