Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनोरंजन क्षेत्रासाठी निश्चित धोरण आणि उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा

Webdunia
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (08:50 IST)
महाराष्ट्रात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात घेता मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण असणे काळाची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत मनोरंजन क्षेत्रासाठी निश्चित धोरण आणि मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिले. 
 
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची 43 वी सर्वसाधारण सभा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.
 
“आज मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकार काम करीत असताना या क्षेत्रामुळे अनेक रोजगार निर्माण होत आहेत. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मनोरंजन क्षेत्रातून मोठी भर पडत असून यामध्ये आणखी वाढ होण्यास वाव आहे. यासाठीच येणाऱ्या काळात चित्रपट निर्मात्यांना मुंबईबरोबरच राज्यातील इतर चित्रीकरण स्थळांकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे”, असं देशमुख म्हणाले.
 
“महामंडळाने गेल्या 15 वर्षाची लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली असून अनेक सार्वजनिक उपक्रमांपैकी नफ्यात असलेल्या काही मोजक्या महामंडळापैकी चित्रनगरी हे एक महामंडळ आहे. यापुढील काळातही ही परंपरा अशीच सुरु राहील. येणाऱ्या काळात महामंडळ केवळ आर्थिक पातळीवरच नाही तर धोरणात्मक पातळीवरही महत्वाची कामगिरी करेल”, असा विश्वास सांस्कृतिक मंत्री देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान घाबरला,फटाके आणि लाऊडस्पीकरवर बंदी

पहलगाम हल्ल्याच्या तपासासाठी एनआयए 3D मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करणार, काय आहे हे

LIVE: नागपुरात हवामान खात्याकडून पावसाचा यलो अलर्ट जारी

नागपुरात जोरदार पावसासह गारपीटामुळे जनजीवन विस्कळीत यलो अलर्ट जारी

मुंबईच्या 'या' प्रसिद्ध खेळाडूवर बलात्काराचा आरोप

पुढील लेख
Show comments