Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या जिल्ह्यात ड्रोनद्वारे लस वाहतूक यशस्वी

Successful drone transport of vaccines in this district या  जिल्ह्यात ड्रोनद्वारे लस वाहतूक यशस्वीMarathi Regional News In Webdunia Marathi
, शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (15:43 IST)
सध्या संपूर्ण जगात वेगवेगळया क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपली कामे जलद व सुलभरित्या पार पाडली जात आहेत. या श्रृंखलेमध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम व लांबच्या कार्यक्षेत्रात ड्रोनद्वारे लस पुरवठा करण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात येत आहे. सदर प्रयोग महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ब्लू इन्फिनिटी इनोवेशन लॅब व आय आय एफ एल फाऊंडेशनच्या मदतीने राबविण्यात येत आहे.
या उपक्रमामध्ये ड्रोनद्वारे लस वाहतुकीमुळे अतिदुर्गम भागात जलद गतीने लस पोहोचवता येईल ज्यामुळे शीतसाखळी अबाधित राहील आणि प्रवासादरम्यान होणाऱ्या वेळेची व मनुष्यबळाची बचत होईल.
हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील काळात ड्रोनद्वारे अत्यावश्यक औषधे पाठविणे, रक्त पाठविणे, प्रत्यारोपण करता अवयव एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत पाठविणे विना अडथळा व अत्यंत कमी वेळामध्ये सहज शक्य होईल.
सदर उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास व सार्वजनिक आरोग्य आयुक्त तथा अभियान संचालक एन.एच.एम डॉ. रामास्वामी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हयाच्या आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांचा सहकार्याने राबविण्यात येत आहे. हा उपक्रम राबविताना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संचालक सार्वजनिक आरोग्य विभाग आणि उपसंचालक मुंबई मंडळ ठाणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य उपयुक्त ठरले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या कारणामुळे शेतकरी भयभीत त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यापासून घाबरतात