Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अशी पण एक सासू! रोज सुनांचे पाय धुते आणि त्यांची पूजा करते

अशी पण एक सासू! रोज सुनांचे पाय धुते आणि त्यांची पूजा करते
, मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (18:44 IST)
आजकाल महाराष्ट्रातील एक महिला चर्चेत आहे. ही महिला आपल्या सूनांना देवाचे वरदान मानते आणि पाय धुवून त्यांची पूजा करते. एवढेच नाही तर ती आपल्या सुनांना लक्ष्मी स्वरुप म्हणून पूजते. ही महिला स्वतः आपल्या सुनांना सजवते, त्यांची पूजा करते तसेच त्यांच्याकडून आशीर्वाद घेते.
 
हे सुखद प्रकरण महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील आहे. आजतक मधील एका अहवालानुसार सिंधुबाई असे या महिलेचे नाव आहे. सिंधुबाई दरवर्षी गौरी पूजेच्या वेळी आपल्या सुनांना लक्ष्मीच्या रूपात त्यांचा मान ठेवत त्यांची तीन दिवस पूजा करतात. या दरम्यान, त्या स्वतः गौरी पूजनाच्या दिवशी आपल्या सुनांना सजवता, त्यांची पूजा करतात आणि त्यांचे पाय धुवून आशीर्वाद देखील घेतात. त्या गेल्या चार वर्षे हे करत आहे. सोशल मीडियावर अनेक चित्रे देखील व्हायरल झाली आहेत ज्यात सिंधुबाई आपल्या दोन सुनांची पूजा करताना दिसत आहेत आणि त्यांचे पाय देखील धुवत आहेत.
 
सुनांना देवीस्वरुप मानणाऱ्या सासू सिंधुबाई सांगतात की सून नेहमी संपूर्ण कुटुंबाची काळजी घेते. ती प्रत्येकाच्या नंतर झोपते आणि प्रत्येकाच्या नंतर अन्न खाते. यानंतरही, जर तुम्ही तिला मध्यरात्री आवाज दिला तर ती प्रत्येक क्षणी कुटुंबाची सेवा करण्यासाठी उभी असते. म्हणूनच त्यांची सेवा करणे आणि त्यांना सन्मान देणे हे आपले कर्तव्य आहे.
 
सासूकडून मिळणार्‍या या सन्मानाने सिंधुबाईंच्या सूनाही खुश आहेत. त्यांनी सांगितले की आमच्या सासूबाई आम्हाला मुलीसाखी वागवतात. आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवू देत नाही. लोक त्यांचे फोटो सोशल मीडियावर खूप शेअर करत आहेत. लोकही सिंधुबाईचे उदाहरण देत आहेत आणि सासूने असेच राहावे असे सांगत आहेत.
 
आपल्या देशात सासू-सून यांचे नातेसंबंध खूप गुंतागुंतीचे असल्याचे समजले जाते. ते नेहमी एकमेकांना अपमानित करण्याचा प्रयत्न करतात पण आजही सिंधुबाईसारख्या स्त्रिया आहेत जे सासूच्या नात्याला चार चाँद लावतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुंटूरमधील पिता पुत्राने मोदींचा लोखंडी स्क्रॅपपासून 14 फूट उंच पुतळा बनवला