Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुर्दैवी घरघुती वादाला कंटाळून पती पत्नीची दोन हजार फुट दरीत उडी मारत आत्महत्या

Webdunia
गुरूवार, 2 मे 2019 (10:04 IST)
पेशाने पहिलवान असलेलेल्या युवकाने सतत घरातील भांडणांना कंटाळून माहेरी गेलेल्या पत्नीला सोबत घेत दोन हजार फुट दरीत उडी घेवून आत्महत्या केली आहे. चिखलदरा येथील भीमकुंड येथे दोन हजार फूट खोल दरीत उडी मारली आहे. दाम्पत्याला एक वर्षाचा मुलगा देखील आहे. मात्र, तो घरी असल्यामुळे बचावला आहे. घरगुती वादातून पत्नी तीन आठवड्यांपासून माहेरी गेली, पतीने तिला समजावून दुचाकीवर आणले आणि दोघांनी भीमकुंड पॉईंट वरून दोन हजार फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. गणेश हेकडे (वय २५) यांचे दोन वर्षांपूर्वी राधा यांच्याशी लग्न झाले. हेकडे दाम्पत्याला एक वर्षाचा बजरंग नामक मुलगा असून, गणेश हा कुस्तीपटू असून अमरावती जिल्ह्यात त्याचा प्रथम क्रमांक होता. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा विद्यार्थी होता मात्र .घरगुती वादातून तीन आठवड्यांपूर्वी रागाच्या भरात राधा माहेरी (मोथा गाव) निघून गेली होती. तर गणेशने काही दिवसांपूर्वीच त्याच्या मुलाला घरी आणले, मात्र सततच्या वादातून कंटाळल्यामुळे गणेशने सासरी जाऊन राधाला दुचाकीवरून आणले, मात्र दोघेही आत्महत्या करणार असल्याचं त्यांनी राधाच्या काकांना सांगितले होते. काका सुदेश महादेव निखाडे यांनी लगेच त्यांच्या मागावर गेले. त्यानंतर काकांना दोघेही शहापूर येथे गेले नसल्याचं समजले, त्यांनी चिखलदरा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनीही तत्काळ भीमकुंड पॉइंट वर गेले, आणि  पाहणी केली असता या दोघांनी उडी मारुन आत्महत्या केल्याचे उघड झाले घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरीतून मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

छगन भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाबद्दल म्हणाले....

MI vs DC : २१ मे रोजी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात व्हर्च्युअल नॉकआउट सामना

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या गाडीवर जोरदार गोळीबार, थोडक्यात बचावले

LIVE: मुंबईत ५३ कोरोना रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली, बीएमसीने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बची धमकी, पोलिसांनी इमारत रिकामी केली

पुढील लेख
Show comments