सोलापूरच्या माढा येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना 2 महिन्यांपूर्वी घडली असून आता या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. मुख्य म्हणजे या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आलेली नव्हती. पोलिसांना कळवण्या ऐवजी मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार केले. आता या प्रकरणात पोलिसांनी कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना माढ्याजवळ शिंदेवाडी गावात गेल्या वर्षीच्या शेवटच्या आठवड्यात घडली. या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे नाव तनुजा अनिल शिंदे असून तिचे कमी वयातच तिचे लग्नकुर्डू येथे राहणाऱ्या धनाजी जगताप नावाच्या तरुणाशी तिचे वडील आणि काकांनी सुनील नारायण शिंदे यांनी लावून दिले.
मात्र ती नवऱ्याकडे न राहता दुसऱ्या गावातील एका तरुणाच्या संपर्कात असून ती 24 डिसेंबर 2023 रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास ती तिच्या काकांना धनाजी शिंदे यांना एका अज्ञात मुलासोबत आढळली त्यांना पाहून इतर दोघे मुलं पळून गेले. काकाने तिला इथे एकटी काय करते असे विचारल्यावर तिने उडावीउडवीची कारणे दिली. नंतर तिच्या काकांनी धनाजी यांनी तिच्या वडील आणि काकाला घरी बोलावून घडलेलं सांगितलं.काका आणि वडिलांनी तिला मारहाण करत घरी आणलं नंतर तिने विषप्राशन करून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती पोलिसांना न देता वडील आणि काकाने परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले. नंतर गावात याची चर्चा झाल्यामुळे हे प्रकरण पोलिसांत पोहोचले
पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी मयत तनुजाचे वडील, अनिल शिंदे, काका सुनील शिंदे आणि धनाजी शिंदे, आणि पती धनाजी जगताप यांच्यावर तनुजाला आत्महत्येस प्रवृत्त करणे, अंत्यसंस्कार विधी परस्पर करणे, कमी वयातच मुलीचे लग्न लावून देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.