Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नैराश्यातून आईने केली मुलासोबत आत्महत्या

Webdunia
गुरूवार, 22 नोव्हेंबर 2018 (12:29 IST)
चंद्रपूरमध्ये बी. कॉम. अभ्यासक्रमाचा पेपर बिघडल्यामुळे नैराश्यातून आईने स्वत:च्या पोटच्या गोळ्याला पदराने पोटाला बांधून रामाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. रुपाली आशिष गुज्जेवार (२८) व अभीर आशिष गुज्जेवार (५) रा. पी.एच.नगर. जुना पॉवर हाऊसजवळ चंद्रपूर असे मृत मायलेकाचे नाव आहे. रुपालीचा सोमवारी बी.कॉमचा पेपर होता. तिच्या सासऱ्याने तिला पडोली येथील समाजकार्य महाविद्यालयात असलेल्या केंद्रावर पोहचवून दिले. पेपर सुटल्यानंतर रुपाली घरी आली. मात्र पेपर बिघडल्यामुळे ती अस्वस्थ होती. तिचा मुलगा अभीर शिकवणी वर्गात गेला असल्याने रुपाली बॅग घेऊन शिकवणी वर्गात गेली. त्यानंतर आपली बॅग व अभीरची ट्युशन बॅग तिथेच ठेवून ‘काही वेळात येते’ असे सांगत ती बाहेर गेली. त्यानंतर रुपाली थेट बगड खिडकी परिसरातील रेल्वे लाईनवर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने गेली. रेल्वे फाटक बंद असल्याने ती फाटकाखालून रुळावर गेली. मात्र तिथे उपस्थित एका व्यक्तीने तिला थांबविले. त्यानंतर ती रुळावरून परत आली. त्यानंतर बुधवारी रामाळा तलावात गेलेल्या मच्छिमारांना रुपाली व अभीरचा मृतदेहच आढळून आला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

नवीन

नागपूरमध्ये ऑटो-रिक्षात ९ वर्षांच्या मुलीचा विनयभंग आरोपीला अटक

LIVE: मराठा आरक्षणावरून मनोज जारंगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील शाब्दिक युद्ध तीव्र

जिओने १० वर्षे पूर्ण केली असून, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ५ कोटी ९ लाख ग्राहक जोडले

एफडीएच्या नवीन नियमानुसार कोणत्याही भंडारा किंवा इफ्तारसाठी सात दिवसांची पूर्वपरवानगी आवश्यक

राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची आपल्या मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी मारून आत्महत्या

पुढील लेख
Show comments