Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Summer Vacation शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर

Summer Vacation शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर
, सोमवार, 3 एप्रिल 2023 (14:30 IST)
विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.  उन्हाळ्याच्या सुट्टीचा विद्यार्थी आतुरतेने वाट पाहतात. कोरोनानंतर यंदा पहिल्यांदाच पूर्ण वर्षभर शाळा सुरळीत सुरू राहिल्या. पण कोरोनामुळे मागील 2 वर्ष शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले होते. राज्यात आता शाळा सुरू झाल्या आहेत पण कोरोनामुळे झालेले नुकसान भरुन काढण्याचे आव्हाने शिक्षक आणि शाळेपुढे आहे. याआधी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्टी रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. पण या बातमीनंतर विद्यार्थ्यांसह पालक ही नाराज होते.  त्यानंतर एप्रिल महिन्यात शाळा पूर्णवेळ सुरू ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार यंदाही 2022-23 या शैक्षणिक वर्षातील अंतिम  सत्र देखील काही दिवसांत संपणार आहे. 
 
पहिली ते नववी आणि आकरावीच्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा 15 एप्रिलपूर्वी संपवली जाणार असून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होऊन 1 मे रोजी त्यांना प्रगतीपत्रक दिली जातील. त्यानंतर शाळांना 2 मे पासून सुट्टी देण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

छत्रपती संभाजीनगरमधील हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत 28 जणांना अटक