suvichar
✕

भाजप निवडणुकांचा पोरखेळ करत आहे - सुप्रिया सुळे

Webdunia
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा केला जात आहे. भाजपच्या या दाव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला. भाजपतर्फे निवडणूकांचा पोरखेळ सुरू आहे असा टोला खासदार सुळे यांनी लगावला. औरंगाबाद येथे जागर युवा संवाद यात्रेदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
 
हे सरकार काम कमी आणि निवडणुका जिंकायच्या कशा याकडे जास्त लक्ष देत आहे. सरकारला सर्वसामान्य माणसांची कामे, प्रश्न याबाबत काही एक देणे घेणे नाही अशी टीका त्यांनी केली. पंतप्रधान कार्यालयही हेच काम करत आहे याचे दुखः होते असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
 
आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, मराठा, धनगर, मुस्लिम या समाजांना तात्काळ आरक्षण मिळावे ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. असंख्य विद्यार्थ्यांना मदतीची गरज आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही पण जे शिक्षण घेऊ इच्छितात अशा होतकरू विद्यार्थ्यांसाठी सरकारने पुढाकार घेऊन तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

नवीन

पालघरमध्ये बिबट्याचा हल्ल्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू; गावकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

सिग्नलमध्ये फेरफार करून महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दरोडा! नेमकं काय घडल? वाचा

"शेवटच्या श्वासापर्यंत सत्तापालट होऊ देणार नाही"; मुख्यमंत्री फडणवीस यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

पुण्यात आयटी प्रोफेशनल तरुणीचा मृतदेह फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला, पतीला अटक

पुण्यात पंतप्रधान मोदी आज नवी मेट्रो लाईन ३ चे उद्घाटन करणार, ४ नोव्हेंबरपासून ट्रेन धावणार

पुढील लेख
Show comments