Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जळगावात शिंदेंच्या सभे नंतर पैसे वाटप करण्याचा सुषमा अंधारेंचा आरोप

Sushma Andhare
, सोमवार, 24 जून 2024 (09:47 IST)
येत्या 26 जून रोजी विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक होणार असून सध्या त्यासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. या निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेले आणि त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या साठी नाशिक, जळगाव, अहमदनगर येथे सभा घेतल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा जळगावात झाली असून या सभे नंतर शिक्षकांना पैसे वाटप करण्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांच्या म्हणाल्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दुजोरा दिला आहे. 

सुषमा अंधारे म्हणाल्या,  मुख्यमंत्र्यांच्या सभे नंतर शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचाऱ्यांना संस्थाचालकांना पैसे वाटप करण्यात आले. निवडणूक आयोग कुठं आहे? असा सवाल त्यांनी केला. मात्र या आरोपाला शिंदे गटाने फेटाळलंआहे. 

संजय राऊतांनी सुषमा अंधारेंच्या वक्तव्याला दुजोरा देत निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. निवडणूक आयोग उघड्या डोळ्याची व्यभिचार पाहत आहे. असे ते म्हणाले. 

नाशिक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान होणार असून नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाकडून किशोर दराडे, अजित पवार राष्ट्रवादी गटाचे महेंद्र भावसार, माविआ गटाकडून संदीप गुळवे हे उमेदवार उभे आहे. तर अपक्षाकडून विवेक कोल्हे हे रिंगणात आहे. 
या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 
 
Edited by - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गडचिरोलीत पत्नीसह नक्षलवाद्याने आत्मसमर्पण केले