Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

हरिहरेश्वर किनाऱ्याला सापडल्या दोन अनोळखी बोटी, महाराष्ट्रात पुन्हा घातपाताचा प्रयत्न!

raigad suspected boat
, गुरूवार, 18 ऑगस्ट 2022 (14:47 IST)
मुंबईतील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे एक बोट संशयास्पदरित्या आढळल्याने रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या बोटीत एके-47 रायफल सापडल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी लागू केली आहे. याशिवाय हरिहरेश्वर येथे एक छोटी बोट सापडली असून त्यात लाइफ जॅकेट आणि काही संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी केली आहे. तपासात दहशतवादी कोनाची पुष्टी झाली नाही. रायगड एसपींनी बोट आणि शस्त्रे सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
वृत्तानुसार श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथे बोटी सापडल्या आहेत. हरिहरेश्वर येथील बोटीत दोन-तीन एके-47 आणि रायफलच्या गोळ्या सापडल्या आहेत. दोन्ही बोटीजवळ कोणीही व्यक्ती सापडलेली नाही.
 
पोलिस बोटीवर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईला लागून असलेल्या रायगडमध्ये दोन संशयास्पद बोटी जप्त, बोट सापडल्यानंतर परिसरात हाय अलर्ट, बोटीतून काही एके 47 रायफलही जप्त, बोटींमधून शस्त्रसाठा जप्त झाल्याच्या बातम्या, 1993 प्रमाणे पुन्हा मुंबई हादरवण्याचा कट, काही बोटीचा शोध घेतल्यानंतर कळेल. मुंबई पुन्हा हादरवण्याचे षडयंत्र. पोलिस बोटीवर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे आयजी म्हणाले. हरिहरेश्वर समुद्रकिनारी सापडली संशयास्पद बोट, 3 एके 47 आणि जड गोळ्या सापडल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अशी मिठी मारली की मोडली बरगड्यांची हाडे