Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एससीईआरटी विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रमातून चाचणी घेणार

Webdunia
गुरूवार, 5 नोव्हेंबर 2020 (09:05 IST)
ऑनलाईन वर्गात शिकवलेले विद्यार्थ्यांना किती आत्मसात केले, हे पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रमातून चाचणी घेतली जाणार आहे.
 
पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला मराठी आणि गणित विषयाच्या व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून चाचण्या होणार आहेत. त्यानंतर ऊर्दू माध्यमाच्या चाचण्या सुरू होणार आहेत. ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांशी संपर्क आणि संवादाचे माध्यम असलेल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्वाध्याय उपक्रम राबवण्यात येणार आहे. एससीईआरटी आणि पुणे व लिडरशीप फॉर इक्विटी आणि कॉन्व्हेजिनियस यांच्या माध्यमातून हे स्वाध्याय तयार करण्यात आले असून, दर शनिवारी स्वाध्याय प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना गणितातील 10 आणि भाषेतील 10 प्रश्न सरावासाठी पाठवण्यात येणार आहे. हे प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे असणार आहेत. दर शनिवारी स्वाध्याय उपक्रम राबवण्यात येणार  आहे.
 
विद्यार्थ्यांकडून सर्व प्रश्नांची उत्तरे देताच त्यांच्या कामगिरीचा अहवाल विद्यार्थ्याला मिळणार आहे. जेणेकरून त्यांना स्वत:च्या कामगिरीचे मूल्यमापन करणे शक्य होईल आणि ते सक्षम होऊ शकती, हा त्याचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा अहवालही शिक्षकांना देण्यात येणार आहे. 
 
पहिली ते दहावीच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या फोनवर क्विझ (प्रश्नमंजुषा) घरच्या घरी फोनवर उपलब्ध असतील.त्याचा उपयोग करून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक विद्यार्थ्यांच्या सद्यस्थितीबद्दल नियमित माहिती मिळवू शकतील असे परिषदेने म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट,अनेकांचा मृत्यू

IND vs BAN Test : चेन्नई कसोटीत भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

पोलिसांच्या सरकारी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली, मृत्यू

वाशिमच्या सरकारी रुग्णालयात किंग कोब्रा विषारी साप शिरला

पुढील लेख
Show comments