Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टी१ या वाघिणीला ठार केले

T1 killed the Waghini
, शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (08:56 IST)
गेल्या काही महिन्यांपासून टी१ या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे कसोशीचे प्रयत्न सुरु होते. अखेर शुक्रवारी रात्री वन विभागाच्या बचाव पथकाने या वाघिणीला ठार केलं. या वाघिणीने आत्तापर्यंत १४ जणांचा जीव घेतला. यवतमाळमधल्या पांढरकवडा वन विभागातील राळेगाव आणि पांढरकवडा या ठिकाणी या वाघिणीची सर्वात जास्त दहशत होती.
 
या वाघिणीच्या दहशतीमुळे केळापूर, राळेगाव, कळंब या ठिकाणची शेतीची कामे ठप्प झाली होती. लोणी, सराटी, खैरगाव, विहिरगाव, येडशी, मिरा, तेजनी या गावांमध्येही वाघिणीची चांगलीच दहशत होती.  पाच शार्प शुटर, तीन मोठे पिंजरे, ५०० वन कर्मचारी आणि खासगी कर्मचाऱ्यांची फौज या ठिकाणी होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओबीसींच्या उत्थानासाठी राज्यात शरद पवार साहेबांचा सिंहाचा वाटा - राजेश टोपे