Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र बंद करू - नाना पटोले

Take immediate action against those who crush farmers
, मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (10:27 IST)
"बसलेल्या शेतकऱ्यांना चिरडून मारण्याची संतापजनक घटना तालिबानी प्रवृत्ती दाखवत असून शेतकऱ्यांना चिरडणारं भाजपचं केंद्रातलं मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातलं योगी सरकार बरखास्त करा," अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
 
लखीमपूर खिरीमध्ये झालेल्या घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई करावी नाहीतर महाराष्ट्र बंद करू, असा इशाराही नाना पटोले यांनी दिलाय. लखीमपूर खिरीमधल्या घटनेचा निषेध करण्यासाठी मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं.प्रियांका गांधी यांना करण्यात आलेल्या अटकेचा निषेधही यावेळी करण्यात आला.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या 5 जागाही आल्या नसत्या - चंद्रकांत पाटील