Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोणतीही भीती न बाळगता कोरोनाची लस घ्या : टोपे

Take the corona vaccine
, बुधवार, 20 जानेवारी 2021 (16:00 IST)
आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणतीही भीती न बाळगता कोरोनाची लस घ्यावी, यासाठी मी त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये दुसऱ्याने लस घेतली की मी घेतो, अशी मानसिकता दिसून येत आहे. मात्र, त्यांनी स्वत:हून पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यांच्या या कृतीमुळे लस सुरक्षित असल्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचेल, असे मत टोपे यांनी व्यक्त केले. 
 
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीच्या सुरक्षिततेविषयी राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या साशंकतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना तुम्ही कोरोनाची लस कधी घेणार, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा टोपे यांनी माझी वेळ आल्यावर मी लस घेईन, असे स्पष्ट केले. केंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत: त्यासाठी पुढाकार घेईन. पण सध्याच्या नियमांनुसार आमचा टर्न नंतर आहे असे सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निवडणूक संपली आता वसूली सुरु केली आहे : फडणवीस