Dharma Sangrah

साताऱ्यात निवडणूक ड्युटीवरून परतणाऱ्या तलाठ्याचा अपघाती मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024 (18:35 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री अडीच वाजता दुचाकीवरून घरी जात असताना तरुण तलाठीचा भीषण अपघात झाला. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पाचवडजवळ उसाने भरलेल्या ट्रॉलीला दुचाकीची धडक बसून तलाठी रोहित अशोक कदम (28 वर्षे) यांचा अपघाती मृत्यू झाला.
 
या अपघातात रोहित यांना डोक्याला जबर मार लागला त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. रोहित यांची दोन महिन्यांपूर्वीच आलेवाडी येथे तलाठी म्हणून नियुक्ती झाली. त्यांचा वर्षभरापूर्वी लग्न झाले असून त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित हे 20 नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या कामासाठी तैनात होते. साताऱ्यात दिवसभर मतदान प्रक्रिया सुरू राहिल्यानंतर मतपेट्या जमा झाल्या. यानंतर रात्री 2 वाजण्याच्या दरम्यान ते साताऱ्याहून भुईंज या गावी निघाले. मात्र पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्यांची दुचाकी उसाने भरलेल्या ट्रॉलीला धडकली.

ही ट्रॉली महामार्गावर उभी असून  रिफ्लेक्टर नसल्याने रोहित कदम यांना ती दिसली नाही आणि त्यांचे वाहन  आहे. मागून येणाऱ्या ट्रॉलीला धडकले. या अपघातात रोहितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. 

रस्त्यावरून जाणाऱ्यांनी भुईज पोलिसांना अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कदम यांना सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डोक्यातून जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya  Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक निकाल: महायुतीने १७ पैकी १६ जागा जिंकल्या, नाशिकमध्ये बंडखोराने शिंदे यांचा डाव उधळला

वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्याची कीटकनाशक पिऊन आत्महत्या

Mumbai Weather Today मुंबईत पावसाची दमदार हजेरी! 'या' भागांमध्ये कोसळल्या जोरदार सरी, IMD कडून वीज चमकण्यासह वादळी वाऱ्याचा इशारा

खरिपासाठी मोठी संधी! शेतकऱ्यांना मिळणार मोफत तूर आणि मूग बियाणे; 'महाडीबीटी'वर अर्ज सुरू

१ जुलैपासून Kia च्या सर्व गाड्या महागणार; तुमच्या खिशावर किती भार पडणार? जाणून घ्या सविस्तर

पुढील लेख
Show comments