suvichar

तळेगावात जनजीवन पूर्वपदावर

Webdunia
सोमवार, 17 ऑक्टोबर 2016 (17:11 IST)
तळेगाव येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचारानंतर निर्माण झालेला तणाव आता कमी झाला. गावातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. सोबतच संवेदनशील असलेल्या आठ गावांमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे गाव सोडून गेलेल्या नागरिकांनी घरी येण्यास सुरुवात केली आहे. मात्र या गावांमधला पोलिस बंदोबस्त अजून काही दिवस कायम ठेवला जाणार असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली़ आहे. 
 
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर दंगल सदृश्य वातावरण झाले होते. काही घरे, एटीबस आणि खाजगी वाहने जाळण्यात आली होती.  या दंगलीचे लोण हळूहळू शहरासह ग्रामीण भागातही पसरले होते़. त्यानंतर संवेदनशील असलेल्या आठ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. गेल्या तीन दिवसांपासून शहर व जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना न घडल्याने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण संचारबंदी हटविण्याचा निर्णय घेतला असल्याचे अधीक्षक शिंदे यांनी सांगितले़ आहे़. 
 
संचारबंदी मागे घेण्यात आल्यामुळे काही दिवसांपासून जवळच्या नातेवाइकांकडे आश्रयासाठी  गेलेल्या नागरिकांनी पुन्हा आपापल्या गावात यायला सुरवात केली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी अशा कुटुंबांची भेट घेऊन प्रशासनाकडून पूर्ण संरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले आहे. काही घरे हल्ल्यात पूर्णपणे उथवस्थ झाली आहेत. सदरच्या घरातील लोकांनी त्यांची आवरासावर सुरू केली आहे. हल्ल्यात नष्ट झालेल्या सामानाची विल्हेवाट, राहिलेल्या साहित्याची आवरासावर करतांना लोक दिसत आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात फसवणूक करणाऱ्या बाबांची १५०० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली

पश्चिम रेल्वेतर्फे वांद्रे टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल दरम्यानच्या ३४ तासांचा जंबो ब्लॉक

पाकिस्तानहून आलेल्या सीमा हैदरने आपल्या मुलाचे नाव 'भारत' ठेवले

पुण्यात मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणी साचले, वाहने पाण्यात तरंगताना दिसली

केंद्र सरकार ने NCERT ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देऊन, त्याला कॅम्पस उघडण्याची आणि अभ्यासक्रम चालवण्याची परवानगी दिली

पुढील लेख
Show comments