Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तटकरेच भाजपच्या संपर्कात, मोठा खुलासा

Tatkare only contact with BJP
, मंगळवार, 27 ऑगस्ट 2019 (15:14 IST)
राष्टवादी कॉंग्रेस पक्षाला फोडण्याचे जोरदार काम सध्या राज्यात सुरु आहेत. आता यामध्ये कोकणातील नेते सुद्धा भाजपच्या वाटेवर आहेत असे चित्र आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी बोलतांना मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की भाजपच्या गळाला लागतील असे एक-दोनजण वगळता जिल्ह्यात बडे मासे आहेतच कुठे? भाजपमध्ये यायला अनेकजण इच्छुक आहेत. एवढेच काय तटकरेच भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र, तटकरे कोण हे लवकरच कळेल, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. हा खुलासा रत्नागिरी नगर वाचनालय येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला. पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी लाड हे जिल्हा दौऱ्यावर आहेत.
 
रत्नागिरी जिल्ह्यातील कोणते बडे मासे भाजपच्या गळाला लागले आहेत, असा सवाल पत्रकारांनी केला होता. लाड म्हणाले की जिल्ह्यात एक दोनजणच बडे मासे असून, ते संपर्कात आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष आता बुडते जहाज बनले आहे. त्यामुळे हे जहाज बुडायच्या आधी ते वाचण्यासाठी अनेकांनी पक्षाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जिल्ह्यात भाजपची स्थिती आता भक्कम आहे, असे ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विधानसभा निवडणूक 2019: महाराष्ट्राच्या विधानसभेची पहिली निवडणूक आणि तीन मुख्यमंत्री