Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तौत्के चक्रीवादळग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय

तौत्के चक्रीवादळग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय
बई , गुरूवार, 27 मे 2021 (22:29 IST)
तौत्के चक्रीवादळानं सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात जोरदार तडाखा दिल्याने बाधित झालेल्या आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. केंद्रशासनाने विहित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने मदत देण्यात येणार असल्यामुळे वाढीव दरामुळे पडणारा आर्थिक भार राज्य शासनाच्या निधीमधुन करण्यास मान्यता देण्यात आली.
 
ही मदत खालील प्रमाणे देण्यात येईल
नैसर्गिक आपत्तीमध्ये  घरे पुर्णत: क्षतिग्रस्त झाले असल्यास किंवा अंशत: पडझड झालेल्या (किमान 15% नुकसान) कच्च्या व पक्क्या घरांपैकी ज्या घरांचे छत क्षतिग्रस्त झाल्याने अथवा पत्रे/कौले/छत उडुन गेल्याने घरातील कपडे व घरगुती भाड्यांचे/वस्तुंचे  नुकसान झाले आहे अशा प्रकरणी कपडे तसेच घरगुती भांडी / वस्तुंकरिता अर्थ सहाय्य प्रति कुटुंब ५ हजार रुपये कपड्यांच्या नुकसानीसाठी आणि प्रति कुटुंब पाच हजार घरगुती भांडी/वस्तु नुकसानीसाठी देण्यात येतील.
पूर्णत: नष्ट झालेल्या  झालेल्या  पक्क्या व कच्च्या  घरांसाठी मदत दीड लाख रुपये प्रति घर आणि अंशत: पडझड झालेल्या (किमान 15 टक्के)  पक्क्या/कच्च्या घरांसाठी मदत १५ हजार प्रति घर तसेच अंशत: पडझड झालेल्या (किमान 25 टक्के)  पक्क्या /कच्च्या घरांसाठी मदत२५ हजार प्रति घर आणि अंशत: पडझड झालेल्या (किमान 50 टक्के)  पक्क्या /कच्च्या घरांसाठी मदत ५० हजार प्रति घर देण्यात येणार आहे. नष्ट झालेल्या झोपडीपैकी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पात्र असलेल्या झोपड्यांना मदत १५ हजार प्रति झोपडी अशी मदत देण्यात येईल. त्याचबरोबर घरातील कपड्यांचे आणि भांड्यांचे नुकसान झालेल्या नागरिकांना 5 – 5 हजार रुपये मदत दिली जाणार आहे.
 
पिकांच्या नुकसानासाठी किती मदत?
बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आलीय. त्यात प्रति हेक्टर बहुवार्षिक पिकांसाठी 50 हजार प्रति हेक्टर, नारळ झाडासाठी 250 रुपये प्रति झाड, सुपारी झाडासाठी 50 रुपये प्रति झाड अशी मदत दिली जाणार आहे.
 
दुकानदार व टपरीधारकारकांना नुकसान भरपाईजे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे आणि जे रेशनकार्ड धारक आहेत, त्यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
मत्सव्यवसायिकांना नुकसान भरपाईबोटींची अंशत: दुरूस्ती करण्यासाठी 10 हजार रुपये. पूर्णत: नष्ट झालेल्या बोटींसाठी 25, हजार रुपये. अंशत: बाधित झालेल्या जाळयांच्या दुरूस्तीसाठी 5 हजार रुपये, पूर्णत: नष्ट झालेल्या जाळयांसाठी 5 हजार रुपये मदतची घोषणा करण्यात आलीय.मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयेनुकसान झालेल्या कुक्कुटपालन शेडसाठी प्रत्यक्ष नुकसानीची रक्कम किंवा जास्तीत जास्त 5 हजार रुपये इतकी मदत देण्यात येईल.
 
चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कुटूंबांना दिनांक 26 ऑगस्ट 2020 च्या शासन निर्णयान्वये मोफत अन्नधान्य आणि केरोसीन वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे. “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या मृत्यूसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 4 लाख रुपये इतक्या रक्कमेसोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अतिरिक्त 1 लाख रुपयांची अशी एकूण 5 लाखाची मदत येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संभाजीराजे भोसले यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली