Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिक्षकांच्या गाडीला मुंढेगावजवळ अपघात, ३ ठार तर ४ गंभीर

Teacher's car crashes near Mundhegaon
, बुधवार, 5 जानेवारी 2022 (21:34 IST)
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळ नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणारा भरधाव कंटेनर पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. पलटी घेताना कंटेनर मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या कारवर जाऊन धडकला. या अपघातात ३  शिक्षक जागीच ठार  झाले.तर ४ शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. कारमध्ये  जिल्हा परिषद शाळांचे ६ शिक्षक होते.  दुपारी साडेचार वाजता सदरचा अपघात झाला.  जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान या  अपघातामुळे मुंढेगावजवळ मुंबईकडून येणारी वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे महामार्गावर नाशिककडून येणारा भरधाव कंटेनर पलटी झाल्याने अपघात झाला. पलटी घेत घेत हा कंटेनर MH 15 EB 0797 ह्या वाहनावर गेला. त्यामुळे ३ शिक्षक जागीच ठार आणि ४ शिक्षकगंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील समनेरे भागातील शिक्षक आहेत.  शेवंता दादू रकीबे वे वय 42, गीतांजली कापडणीस - सोनवणे वय वय 42 रा. नाशिक ह्या गंभीर जखमी असून अन्य २ जखमी आहेत. तर 
धनंजय कापडणीस (समनेरे), किशोर राजाराम पवार (धोंगडे वाडी), ज्योत्स्ना  टिल्लू (मालूनजे) यांचा मृत्यू झाला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संजय राऊत गोवा दौऱ्यावर, कोरोनाची लागण झालेली नाही