Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

काय सांगता ,नाशिकच्या बाजारपेठेत येण्यासाठी 5 रुपये फी आकारावी लागणार

काय सांगता ,नाशिकच्या बाजारपेठेत येण्यासाठी 5 रुपये फी आकारावी लागणार
, बुधवार, 31 मार्च 2021 (21:14 IST)
महाराष्ट्रातील नाशिकमध्ये कोरोनाव्हायरसच्या वाढत्या कहरला लक्षात घेता पोलिसांनी एक नवे आदेश जारी केले आहेत. त्यात म्हटले आहेत की जो कोणी मोठ्या बाजारपेठेत शॉपिंग मॉलमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी जात असेल, त्याने प्रथम 5 रुपये शुल्क भरावे आणि जर बाजारात त्यांना एकांतासापेक्षा अधिक वेळ लागणार असेल तर त्यांना 500 रुपये दंडशुल्क म्हणून द्यावे लागणार.हा आदेश नाशिकच्या पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी काढला आहे.
नाशिकमध्ये झपाट्याने वाढणार्‍या कोरोनाचे प्रकरण थांबवता येतील यासाठी हे केले गेले आहे. नाशिक पोलिस
आयुक्तांचा असा विश्वास आहे की या मार्गाने लोक कमीतकमी घराबाहेर पडतील आणि आपले काम लवकर आटपवून घरी परत जातील. या मुळे कोरोनाचा धोका टाळता येईल. 
असे मानले जाते की देशातले हे पहिलेच आदेश आहे ज्यामध्ये पोलिसांनी बाजारात येणाऱ्या लोकांना दंड ठोठावला आहे आणि ते जर एका तासापेक्षा जास्त काळ बाजारात राहिले तर त्यांना 500 रुपये दंड करण्याची तरतूद आहे.
महाराष्ट्रात कोरोना विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 2 दिवसांत राज्यात 70000 हून अधिक कोरोना विषाणूची प्रकरणे आली आहेत आणि दीडशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा विचार करता, महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाने महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आणि शहरांमध्ये लॉकडाउन आणि रात्री कर्फ्यू लागू केले आहेत. नाशिकमध्येही परिस्थिती तितकीशी चांगली दिसत नाही, तिथेही कोरोना विषाणूची झपाट्याने वाढ होत आहे. हेच कारण आहे की बाजारपेठांमध्ये तसेच मॉल्समध्ये गर्दी नसल्याने नाशिक आयुक्तांनी हा आदेश जारी केला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

NIA चा धक्कादायक खुलासा! सचिन वाझे यांनी विस्फोटक साहित्य खरेदी केले होते.