Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फलकावरून साताऱ्यात तणाव, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे तपासाचे आदेश

Tension
, शनिवार, 9 जानेवारी 2021 (16:12 IST)
राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काल अचानक सर्वांना धक्का देत शहरात उभारलेल्या ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन केले. प्रवेशद्वारावर छत्रपती संभाजी महाराज असा फलक लावण्यात आला होता. मात्र, हा फलक रात्री अज्ञात व्यक्तीने फाडल्याने साताऱ्यात वातावरण चांगलेच तापले असून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. 
 
पोवईनाका भागात तणावाची परिस्थीती निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांनीही पोलीस बंदोबस्त वाढवला. उदयनराजे समर्थकांनी या घटनेचा निषेध करत मूक मोर्चा काढला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा फलक लावण्यात आला. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या घटनेच्या तपासाचे आदेश दिल्यानंतर तणाव निवळला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

20 जानेवारीपर्यंत 50% विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरू होणार