अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चिंचेवाडी येथे छोटा हत्ती टेंम्पो व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची समोरासमोर जोरदार धडक होवून एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
हा अपघात मंगळवार ता.१४ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडला. हा अपघात इतका भयानक होता की ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले आहे. आणि टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.या अपघातात टेंम्पो चालक सुनील दत्तात्रय मोहपे हे जागीच ठार झाले होते.
पोपट मारूती डोमाळे वय वर्षे (२८) ,मिराबाई पोपट डोमाळे वय वर्षे ( २५) व मुलगी लक्ष्मी पोपट डोमाळे वय वर्षे ( ८) हे सर्व राहणार बिरेवाडी जखमी झाले आहेत.याबाबत घारगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी छोटा हत्ती टेंम्पो चालक सुनील दत्तात्रय मोहपे रा.दसई ता.मुरबाड जि.ठाणे हा पोपट मारूती डोमाळे वय वर्षे (२८) ,
मिराबाई पोपट डोमाळे वय वर्षे ( २५) व मुलगी लक्ष्मी पोपट डोमाळे वय वर्षे ( ८) हे सर्व राहणार बिरेवाडी यांना घेवून बिरेवाडी येथे जात होता मंगळवारी रात्री आकरा वाजेच्या सुमारास चिंचेवाडी येथे आला असता त्याच दरम्यान साकूर कडून संगमनेरच्या दिशेने
ऊस घेवून जाणाऱ्या दोन्ही वाहणांची जोराची धडक झाली हा अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले आहे.जोराचा आवाज झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तर टेंम्पो चालक आतमध्ये अडकला होता.
त्यानंतर नागरिकांनी त्याला व जखमींना बाहेर काढले या अपघातात टेंम्पो चालक सुनील दत्तात्रय मोहपे हे जागीच ठार झाले होते.त्यानंतर घटनेची माहिती घारगाव पोलीसांना देण्यात आली पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश लोंढे, नामदेव बिरे, संतोष फड यांनी
घटनास्थळी धाव घेतली होती झालेल्या भिषण अपघातात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले होते तर टेंम्पोचेही मोठे नुकसान झाले आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दसरथ वायाळ हे करत आहे.