Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

परीक्षेच्या एक दिवस आधी TETचा पेपर फुटला, उद्याची परीक्षा रद्द

TETचा पेपर फुटला
उद्या २८ जून २०२६ रोजी होणारी  TET परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली आहे.  ठाणेमध्ये पेपर लीक झाल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकला आणि काही जणांना ताब्यात घेतले. तसेच भिवंडी आणि इतर ठिकाणीही संशय असल्याने खबरदारी म्हणून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE) ने अधिकृत नोटिस जारी केली आहे. नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार ठाणे आणि भिवंडी परिसरात परीक्षेच्या अवघ्या २४ तास आधी प्राथमिक स्तरावर पेपर लीक झाल्याची माहिती समोर आली. यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE) सुरक्षेचा उपाय म्हणून तातडीने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे आणि भिवंडी परिसरात काही संशयित लोक पैसे घेऊन प्रश्नपत्रिका वाटत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. पोलिसांनी कारवाई करत काहींना ताब्यात घेतले असून मुख्य प्रश्नपत्रिका जप्त केली आहे. राज्यभरातून सुमारे ६ लाख उमेदवार उद्या ही परीक्षा देणार होते, ज्यांचा या निर्णयामुळे मोठा खोळंबा झाला आहे.
 
नवीन तारीख कधी?
परीक्षा परिषदेकडून अद्याप नवीन तारखेची अधिकृत घोषणा झालेली नाही. शिक्षण विभागाच्या पुढील आदेशानंतर सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाईल.परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे. 
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेना यूबीटी भाजपसोबत हातमिळवणी करणार? विमानात फडणवीसांशी झालेल्या संभाषणाबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले....