Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टीईटी घोटाळा : अश्विन कुमार यांच्याकूडून एक कोटींपेक्षा अधिकचा ऐवज जप्त

TET scam: More than Rs 1 crore seized from Ashwin Kumar टीईटी घोटाळा : अश्विन कुमार यांच्याकूडून एक कोटींपेक्षा अधिकचा ऐवज जप्त Marathi Regional News  In Webdunia Marathi
, सोमवार, 27 डिसेंबर 2021 (10:34 IST)
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी जी.ए. सॉफ्टवेअरचे अश्विन कुमार यांच्या घरात घेतलेल्या झडतीमध्ये एक कोटांपेक्षा अधिकचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. 
यामध्ये 1480.680 ग्रॅम सोनं, हिरेजडीत दागिणे आणि 27 किलो चांदी यांचा समावेश आहे. त्याची एकूण किंमत 1 कोटींपेक्षाही जास्त असल्याची माहिती मिळाली आहे.
दुसरीकडे तुकाराम सुपे यांच्या घरी दोन वेळा टाकलेल्या धाडीत सोने आणि रोख असा जवळपास 3 कोटींचा ऐवज जप्त केला आहे. सुपे यांचे नातेवाईक आणि नीकटवर्तीय आता पोलिसांच्या रडारवर आहेत. सुपेंच्या जवळच्या दोघांनी गेल्या दोन दिवसांत 58 लाख पोलिसांकडे आणून दिले आहेत.
राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष, उच्च आणि माध्यमिक औरंगाबाद विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरेसह, बेंगळुरूतून जी.ए. सॉफ्टवेअरचे संचालक अश्विन कुमार यांना अटक करण्यात आली आहे. तसंच जी ए सॉफ्टवेअरचे माजी संचालक सौरभ त्रिपाठीलादेखील अटक झाली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात मंगळवारपासून पावसाची शक्यता