Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवाजी महाराज कन्नड होते हा इतिहास ठाकरे यांना माहिती नाही

Thackeray does not know the history of Shivaji Maharaj being Kannada
, सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (10:41 IST)
कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांचे पूर्वज कन्नड होते, असा अजब दावा केला आहे. 
 
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत कर्नाटकातील मराठी भाषिक भाग केंद्रशासित प्रदेश जाहीर करावेत अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती त्यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोल म्हणाले, की ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे नाव शिवाजी महाराजांच्या नावावरून ठेवले असले तरी शिवाजी महाराज कन्नड होते हा इतिहास त्यांना माहिती नाही. शिवाजी महाराजांचे पूर्वज बेलीयप्पा हे गदग जिल्ह्यातील सोरतूरचे असून  दुष्काळ पडल्यानंतर ते महाराष्ट्रात गेले. शिवाजी महाराज त्या घराण्यातील चौथ्या पिढीतील प्रतिनिधी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
 
तसेच दुसरे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी ठाकरे यांच्या विधानावर मुंबई हा कर्नाटकचा भाग करावा व केंद्राने त्या निर्णयापर्यंत मुंबई हा केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा, अशी मागणी केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

6 हजारापेक्षा कमी किमतीच्या फोनला 1 फेब्रुवारी रोजी भारतात लाँच केला जाईल, 5000mAh बॅटरी मिळेल