Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना लढाईतील ठाणेकरांचं काम मार्गदर्शक – खासदार संजय राऊत

Webdunia
मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (22:12 IST)
खासदार राऊत यावेळी म्हणाले, जे कोरोना प्रतिबंधासाठीचे नियम पाळत नाहीत ते त्याच्या संसर्गाला आमंत्रण देतात. रुग्ण वाढले की ऑक्सिजनची मागणी वाढते त्यावेळी अशा प्रकारच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची गरज भासते. कोरोना लढाईत ज्या प्रकारे काम ठाणेकरांनी काम केलं आहे ते मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार  सरनाईक यांनी प्रास्ताविक केले. नगरसेविका परिषा सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
 
ऑक्सिजन प्रकल्पाविषयी…
आमदार सरनाईक यांनी आपल्या ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणेकर नागरिकांच्या सोयीसाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. मंगळवार ३१ ऑगस्ट रोजी गोपाळकाला असून त्या दिवशी उत्सवाचे मोठे आयोजन न करता ‘आरोग्य उत्सव’ अंतर्गत हा ऑक्सिजन प्लांट लोकांच्या सेवेसाठी अर्पण केला जाणार आहे.
 
प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्टने – ठाणे शहरात, रेमंड कंपनी समोर, विहंग पाम क्लब येथे हा कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. ठाण्यातील हा ऑक्सिजन प्लांट सुरु होत असून दिवस-रात्र या प्लांटमधून आपल्या शहराला ऑक्सिजन सेवा मिळणार आहे. त्यासाठी प्रशिक्षित ऑपरेटर, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. हवेतून ऑक्सिजन निर्माण करून त्याचे फिल्टरेशन करून ते सिलेंडरमध्ये भरले जाणार आहे. या  प्लांटमधून १२० सिलेंडर ऑक्सिजन दिवसाला मिळणार आहे. हे ऑक्सिजन जनतेला विनामूल्य उपलब्ध होणार आहे.
 
हा ऑक्सिजन  प्लांट लोकांसाठी २४ तास सुरु राहील. रिकामे सिलेंडर घेऊन येणाऱ्या नागरिकांना भरलेले ऑक्सिजन सिलेंडर येथून दिले जाईल. तसेच ज्यांच्याकडे सिलेंडर नसेल त्यांना डिपॉजिट घेऊन मोफत ऑक्सिजन सिलेंडर देण्याची ही योजना आमदार सरनाईक यांनी तयार केली आहे. दररोज निर्माण होणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा पालिका, सरकारी हॉस्पिटल तसेच गरज पडल्यास खासगी हॉस्पिट्लनाही केला जाईल. कोरोना पूर्णपणे हद्दपार होईपर्यंत व त्यानंतरही ही ऑक्सिजन सेवा सुरु राहणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट,अनेकांचा मृत्यू

IND vs BAN Test : चेन्नई कसोटीत भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

पोलिसांच्या सरकारी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली, मृत्यू

वाशिमच्या सरकारी रुग्णालयात किंग कोब्रा विषारी साप शिरला

पुढील लेख
Show comments