Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हाच आमच्यात आणि भाजपात फरक - संजय राऊत

Webdunia
सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (15:20 IST)
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यात संताप व्यक्त होत असून शिवसेनेच्या ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला. राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुने काळातील आदर्श आहेत, असे विधान केले होते. त्यावरुन, संजय राऊतांनी भाजपला प्रश्न विचारला आहे. आता, कोणाच्या फोटोला जोडे मारणार, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. त्यानंतर, याप्रकरणावर फडणवीसांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुनही त्यांनी भाजपला लक्ष्य केलं.
 
“राहुल गांधींच्या वक्तव्याचे आम्हाला समर्थन करता आले असते. मात्र, आम्ही तसे केले नाही. आम्ही राहुल गांधींचा बचाव केलेला नाही, हाच आमच्यात आणि भाजपात फरक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर दुसरं कोणी काही बोललं असतं तर भाजपाने थयथयाट केला असता. पण, आज तुमचे राज्यपाल, तुमचे प्रवक्ते शिवरायांचा अवमान करणारी वक्तव्ये करत आहेत. हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे. तरीही तुम्ही त्यांचा बचाव करत आहात. म्हणजेच तुमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रासंदर्भातील त्यांचे प्रेम खरे नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. तसेच महाराष्ट्रातील जनता राज्यपालांना माफी मागायला लावेल, असेही राऊत यांनी म्हटले.
 
आता यांच्या फोटोला जोडे मारणार का?
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असं  विधान भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी विधान केलं आहे. या संतापजनक विधानाचं भाजपा समर्थन करता का? सावरकरांच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींना जोडे मारण्याची भाषा करता मग आता अशी विधानं करणाऱ्या राज्यपाल आणि प्रवक्त्यांना जोडे मारणार आहात का?, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित करत भाजपावर कडाडून टीका केली.

Edited By -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

नितीन गडकरींचा मोठा आरोप, 'काँग्रेसने ग्रामीण भारताला प्राधान्य दिले

तरुणाने भाजप उमेदवाराला आश्वासनांबद्दल प्रश्न केला,रॅलीच्या ठिकाणाहून ढकलून बाहेर काढले

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक नेता बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना युबीटीतून हकालपट्टी

पुढील लेख
Show comments