Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

त्यामुळेच संजय राऊत 'झिंग झिंग झिंगाट' झाले : पडळकर

That is why Sanjay Raut became 'Zing Zing Zingat': Padalkarत्यामुळेच संजय राऊत 'झिंग झिंग झिंगाट' झाले  : पडळकर  Marathi Regional News
, शनिवार, 29 जानेवारी 2022 (14:53 IST)
वाईन विक्रीच्या मुद्यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राऊतांवर बोचरी टीका केली. "जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांमुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकीबाबत फडणवीस खुलासा करतील. त्यामुळेच संजय राऊत 'झिंग झिंग झिंगाट' झाले आहेत. जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे नमूद करणार का, की महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी असणार असून परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना परवानगी नसेल", असा सवाल पडळकरांनी महाविकास आघाडी आणि संजय राऊतांना केला.
 
"जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावं लागले नव्हतं ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावं लागलं. गावच्या गाव अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला", असा आरोप त्यांनी केला.
 
"शरदचंद्र पवारांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करताय. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात सोसलं आणि त्याची त्यांनी खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका शरद पवार कधीही घेणार नाहीत", असा विश्वासही पडळकरांनी व्यक्त केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सपा सरकारने हज हाऊस बांधले, आम्ही कैलास मानसरोवर भवन, सीएम योगींचा अखिलेशवर हल्लाबोल