Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घाटात आढळली अपघातग्रस्त कार; चालकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

Webdunia
शनिवार, 4 मार्च 2023 (21:21 IST)
सिन्नर- घोटी महामार्गावरील एक धक्कादायक घटना सामोर आली आहे. सिन्नर- घोटी महामार्गावरील घोरवड गावाजवळ काल रात्री दहाच्या सुमारास एक अपघातग्रस्त कार आढळून आली. या कारचा पूर्ण चक्काचुर झालेला होता.ही कार महामार्गालगतचा कठडा तोडून लगतच्या विहिरीला धडकली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
 
मात्र, या चालकाचा मृतदेह तेथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल जयभवानी येथे रसवंतीच्या शेडच्या अँगलला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत सकाळी आढळून आला आहे.
 
घटनेची माहिती समजताच सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, हरिश्चंद्र गोसावी, पोलीस नाईक विनायक आहेर, गौरव सानप, निवृत्ती गीते अंकुश दराडे आदींनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी केली व पंचनामा केला.
 
सुरुवातीला कारचालकाचा शर्ट शेजारील डोंगराच्या पायथ्याशी सापडला. त्यानंतर कारचालकाचा मृतदेह पोलिसांना कारजवळ नव्हे तर हॉटेल जयभवानी सिन्नर महामार्ग येथे म्हणजे अपघात घडला त्या ठिकाणापासून तब्बल चार किलोमीटर अंतरावर शेडच्या अँगलला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने,
 
कारचालकचा अपघात होऊन तो हॉटेल जय भवानी येथे येऊन त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, अपघाताचा बनाव करुन आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करीत आहे, अशीही चर्चा आहे.
 
आकाश मोहन खताळे (वय 24) रा. अंबड चिंचाळे असे या कारचालकाचे नाव आहे. कारचालक हा पांढुर्ली येथे आपल्या नातेवाईकांकडे आला होता, मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
 
अपघाताच्या प्रकाराने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. याबाबत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र गोसावी तपास करीत आहेत.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: आदित्य यांचा उद्धव-राज युतीला पाठिंबा

आदित्य यांचा उद्धव-राज युतीला पाठिंबा, एकत्र येण्याचे संकेत

भारताची अव्वल खेळाडू श्रीजा अकुला टेटे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पराभूत

अमेरिकेत तीव्र वादळाचा तडाखा, इमारती कोसळल्या; केंटकीमध्ये 14 आणि मिसूरीमध्ये सात जणांचा मृत्यू

भारताने बांगलादेशच्या या वस्तूंच्या आयातीवर बंदर बंदी घातली

पुढील लेख
Show comments