Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वऱ्हाडाचा टेम्पाे सुमारे १५० फूट दरीत कोसळला, २ ठार, ६१ जखमी

The bride's tempo
, शनिवार, 9 जानेवारी 2021 (10:19 IST)
पोलादपूर तालुक्यातील कुडपण गावाजवळ पाथरी खिंडीमध्ये एका वळणावर लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पाे सुमारे १५० फूट दरीत कोसळला. या भीषण अपघातामध्ये दाेघांचा मृत्यू झाला आहे, तर ६१ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लग्नसोहळा उरकून वरपक्ष नववधूला साताऱ्याहून खेड येथे घेऊन येत असताना हा अपघात घडला.
 
अपघातातील जखमींना महाड, पाेलादपूर येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाला. सातारा जिल्ह्यातील कुमटे-काेंडाेशी येथून लग्नकार्य आटपून वऱ्हाड रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-खवटी येथे परतत हाेते. पात्री खिंडीतून परतत असताना एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडल्याची शक्यता आहे. विठ्ठल बक्कु झोरे (६५, रा. खवटी ता. खेड), तुकाराम दत्तू झोरे (४०,रा. कावले, कुंभारडे ता. महाड), भावेश हरिश्चंद्र होगाडे (२३, रा. तुळशी धनगर वाडी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवसिंग सोलंकी यांचे निधन, गुजरातचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिले होते