Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्र्यांनी अर्णव गोस्वामी यांना मुलाखत द्यायला हवी होती

The Chief Minister
, शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (08:58 IST)
महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत आज  सकाळी प्रसारित होत आहे. त्यापूर्वी शिवसेनेचे कट्टर विरोधक नितेश राणे यांनी एक ट्विट करुन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
 
महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना मुलाखत द्यायला हवी होती. ही मुलाखत कंगनाच्या कार्यालयात व्हायला पाहिजे होती आणि त्यामध्ये सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावर चर्चा झाला पाहिजे होती. तो खरा धमाका ठरला असता. पण सरतेशेवटी मुलाखत कोणाला द्यायची हा उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे, असे नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांचा भाजपाला इशारा