suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बारावीच्या निकालाची तारीख जाहीर: उद्या दुपारी १ वाजता लागणार ऑनलाईन निकाल

Where to check the 12th-grade results
दरवर्षीप्रमाणेच यंदाही बारावीच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावी (HSC) निकाल २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता जाहीर करणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. तसेच निकाल जाहीर होण्याची वेळ दुपारी १:०० वाजता आहे.
 ALSO READ: महाराष्ट्रात १ मे पासून डिजिटल जनगणनेला सुरुवात, प्रथमच संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट्स जिथे निकाल पाहता येईल.
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org


निकाल कसा पाहावा?
तुम्हाला सीट नंबर आणि आईचे नाव (Mother's first name) लागेल. निकाल आल्यानंतर मार्कशीट डाउनलोड करता येईल.
काही विद्यार्थी/पालकांना निकालाच्या दिवशी वेबसाइट्सवर खूप ट्रॅफिक असल्याने लोड होण्यास वेळ लागू शकतो.
निकाल पाहिल्यानंतर त्याची एक डिजिटल कॉपी (PDF) सेव्ह करा किंवा शक्य असल्यास प्रिंट काढून ठेवा.
जर तुम्हाला तुमच्या गुणांबद्दल शंका असेल, तर बोर्डाकडून गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याबद्दलच्या तारखा बोर्डाकडून लवकरच जाहीर केल्या जातील.
ALSO READ: १ मे रोजी आज महाराष्ट्रात काय उघडे आणि बंद राहील?

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: महाराष्ट्रात १ मे पासून डिजिटल जनगणना सुरू