Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धक्कादायक: बापानेच केला मुलाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

Webdunia
गुरूवार, 13 जानेवारी 2022 (15:31 IST)
नाशिक: बापानेच मुलाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुचाकीवर जात असताना वडिलांनीच मुलाला गाडीवरून ढकलून देण्याची घटना घडली.या प्रकरणात वडिल विनोद रामसिंग नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोएल विनोद नाईक हा लासलगाव येथील सेव्हन्थ डे इंग्लिश मिडीयम मिशनरी स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. जोएलला शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या. साडेबाराच्या सुमारास त्याचे वडील विनोद रामसिंग नाईक (रा. नागरे नगर, निजामपूर, तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार ) हे 21 डिसेंबर रोजी त्याला घरी नेण्यासाठी आले होते..
 
जोएलला मार्केटला फिरवून आणतो असे खोटे सांगून त्याला मोटार सायकलवर बसवून नाशिक नंदुरबारच्या दिशेने घेवून गेले. मात्र जोएल याने विरोध करून गाडी थांबवा असे सांगितल्याने वडिलांनी जोएल याला जीवे मारण्याची धमकी देऊन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मोटार सायकलवरून ढकलून दिल्याने जोएलच्या हाता पायाला दुखापत झाली आहे.
 
याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील येथील विसरवाडी पोलीस ठाण्यात 3 जानेवारी 2022 रोजी फिर्याद दिली असून सदर गुन्हा लासलगाव हद्दीत घडल्याने हा गुन्हा लासलगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलां आहे. आरोपीवर कलम 307, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींला अजून अटक करण्यात आलेली नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

हवामान विभागाने देशातील १४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला

पालघर मध्ये केमिकल कारखान्यात गॅस गळती, १० कामगारांची प्रकृती खालावली

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

पुढील लेख
Show comments