Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

देशातील पहिली इंटरसिटी इलेक्ट्रीक बस सेवा सुरु

देशातील पहिली इंटरसिटी इलेक्ट्रीक बस सेवा सुरु
, शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (10:16 IST)
भारतातील पहिली इंटरसिटी इलेक्ट्रीक बस सेवा मुंबई पुणे मार्गावर धावणार आहे. या इलेक्ट्रीक बस २ तास चार्ज केल्यानंतर तब्बल ३०० किलोमीटरपर्यंत धावू शकतात. या इलेक्ट्रीक बसच्या सुरुवातीला मुंबई पुण्यादरम्यान दिवसातून २ फेऱ्या होणार आहेत.
 
इतर बससेवेप्रमाणं या बसचं भाडं हे ४५० ते ५०० रूपये इतकं असेल. वातानुकुलित या इलेक्ट्रीक बसमधून 43 प्रवासी प्रवास करु शकतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या इलेक्ट्रीक बसमुळं प्रदूषण होणार नाही.
 
मुंबईतल्या अंधेरीमध्ये या इलेक्ट्रीक बसचं लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते पार पडलं. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराज इंदुरीकरांना अखेर कायदेशीर नोटीस