सध्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. ते राज्यात फिरून लोकांशी संवाद साधत आहे. शनिवारी सांगलीत देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाचे आराध्य दैवत विरोबाच्या मंदिराचे दर्शन घेतले. सध्या विरोबाची जत्रा सुरु आहे. राज्यातीलच नव्हे तर कर्नाटक आणि इतर राज्यातील धनगर समाजातील विरोबाला मानणारे लोकं इथे दर्शनास येतात. विरोबा हे धनगर समाजाचे आराध्य दैवत असून या देवाला तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश राज्यातून धनगर समाजाचे भाविक दर्शनास येतात. विरोबा मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी केंद्राकडून निधी आणण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आमच्या सरकारने या मंदिराच्या बांधणी साठी 5 कोटी रुपये दिले होते. त्यात मंदिराचे काही काम झाले. पण मला गोपीचंद पडळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुनर्बांधणीत 165 कोटीचे काम असल्याचे सांगितले. या कामाचा आराखडा तयार केला असून केंद्राकडून पैसे मिळतातच पुन्हा पुनर्बांधणीचे काम सुरु होईल.
ते म्हणाले धनगर समाज हा राज्यातील मागासवर्गीय आहे. त्यांना त्यांच्या हक्कासाठी लढावे लागते. फडणवीस सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून राज्यातील गरीब घटकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. या दौऱ्यात त्यांच्या सह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, सुधीर गाडगीळ, सदाभाऊ खोत हे भाजपचे नेते देखील आहे.