Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोलिस यंत्रणेबाबत सरकारचे गांभीर्य नाही – प्रविण दरेकर

पोलिस यंत्रणेबाबत सरकारचे गांभीर्य नाही – प्रविण दरेकर
, मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (07:51 IST)
सध्या पोलिसांवरील हल्ल्यामधे वाढ होत आहे. सरकारचे पोलिस यंत्रणेकडे दुर्लक्ष होत असल्यानेच या घटना वाढत आहेत. सरकारला पोलिसांबाबत गांभीर्य नाही. येथुन पुढे पोलिसांवरील हल्ले करणारी प्रवृत्ति सहन करणार नाहीं. राज्य सरकारने देखील ही प्रवृत्ती संपविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. पुण्यातील कासारवाड़ी येथील मैक्स न्युरो हॉस्पिटलमधे मारहाण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याची विचारपूस करण्यासाठी दरेकर आले होते. या वेळी ते बोलत होते.
 
दरेकर म्हणाले की, वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यांना रॉडने मारहान करण्यात आली. सुरक्षा करणाऱ्या पोलिसांचा जीवच सध्या धोक्यात आहे. या घटना वारंवार घडतात. तय ठिकाणी मी जातो. पोलीसच असुरक्षित असतील तर त्याबाबत न्याय कोणाकडे मागणार असा प्रश्न आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे. पूर्वी हाफ पैंट घालुन पोलिस आले की नागरिक घाबरायचे. मात्र आता ती परिस्थिति राहिली नाही. संबधित वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याला जबर इजा झाली आहे. त्याबाबत लागेल ती मदत आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून करु, असे आश्वासन या वेळी दरेकर यांनी दिले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पैलवानकीचे प्रशिक्षण घेणाऱ्यासह तिघांना खडक पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात अटक