Marathi Biodata Maker

खर्चाला पैसे देत नाहीत म्हणून नातवानेच केला आजी आजोबांचा खून

Webdunia
सोमवार, 5 डिसेंबर 2022 (08:48 IST)
नाशिक : खर्चाला पैसे देत नाहीत म्हणून नात्वानेच आजी आणि आजोबांचा खून केल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे…
 
वेरुळे (ता. कळवण) येथील उंबरदरी शिवारातील नारायण मोहन कोल्हे (वय ९४) व सकुबाई नारायण कोल्हे (वय ८८)यांनी खर्चाला पैसे दिले नाहीत, म्हणून रागाच्या भरात नातू काळू ऊर्फ राजकुमार हरी कोल्हे (रा. वरखेडा ता. कळवण) याने दोघांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांना जीवे ठार मारले.
 
शुक्रवार (ता. ३) रोजी मध्यरात्री संशयिताने दोनच्या सुमारास पैसे देण्यावरून भेदभाव करतात, याचा राग धरून वेरुळे येथील आजोबांच्या राहत्या घराच्या पडवीत असलेल्या कुऱ्हाडीने झोपेतच दोघांच्या डोक्यावर वार करून त्यांना जीवे ठार मारले.
 
अभोणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेरूळे यथील उंबरदरी शेतवस्तीत राहणार्‍या वृद्ध आई वडिलांना भेटण्यासाठी तसेच गावात डोंगर्‍यादेवाचा कार्यक्रम असल्याने मुलगा अमरचंद नारायण कोल्हे हे सकाळी 10 वाजेच्या सुमारास घरी गेले असता घराच्या बाजूला आईचा मृतदेह  व घरात वडीलांचा मृतदेह रक्ताच्या थोराळ्यात दिसून आला. त्यानंतर मुलगा अमरचंद यांनी अभोणा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती कळविली.
 
मयत नारायण, सकुबाई यांचा मुलगा अमरचंद कोल्हे (अभोणा ता. कळवण) यांनी येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहाय्यक निरीक्षक नितीन शिंदे व त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपी राजकुमार हरी कोल्हे यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. श्री. शिंदे व उपनिरीक्षक एकनाथ भोईर पुढील तपास करीत आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

Delhi Zoological Museum दिल्ली प्राणीसंग्रहालयातून 'कोल्ह्यांचे' पलायन, तातडीने शोध मोहीम सुरू

वर्धा : ट्रॅक्टर-टँकरला कारची धडक, दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

मुंबईच्या मतदार यादीवर वाद, निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करत विरोधकांचा हल्लाबोल

LIVE: मुंबईची मतदार यादी वादग्रस्त म्हणत विरोधकांनी केला हल्लबोल

जिवलग मैत्रिणीच्या वडिलांनी १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली

पुढील लेख
Show comments