Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरपीएफ जवानाच्या सतर्कतेने वाचला तरुणाचा जीव

Webdunia
सोमवार, 20 जून 2022 (18:20 IST)
प्रवाशांनी चालत्या रेल्वेतून चढू किंवा उतरू नये. असे आवाहन आणि सूचना वारंवार रेल्वे कडून देण्यात येतात तरी ही आपला जीव धोक्यात घालत काही बेजबाबदार प्रवाशी चालत्या रेल्वेतून चढ उतर करतात. काहींचे नशीब बलवत्तर असतात की ते रेल्वेत चढताना किंवा उतरताना पडल्यावर वाचतात. पण सर्वांचे नशीब बलवत्तर नसते. आणि अशा परिस्थितीत काही जणांना आपले प्राण गमवावे लागतात. 

अशा घटना घडल्यावर देखील काही जण आपला जीव धोक्यात टाकून चालत्या रेल्वेतून चढतात किंवा उतरतात. 
धावत्या ट्रेनला पकडण्याच्या प्रयत्न करताना एका तरुणाचा जीव आरपीएफ जवानाचा सतर्कतेमुळे वाचला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. तरुणाचे प्राण वाचविल्याबाबद्दल आरपीएफ जवानाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ही संपूर्ण घटना आहे वर्धाच्या रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 2 वर ची. 

एक 26 वर्षाचा नितीन नावाचा तरुण वर्धा रेल्वे स्थानकावर अकोल्याला जाणारी सुपरफास्ट ट्रेनची वाट पाहत उभा होता. ट्रेन आली आणि तरुण त्याला पकडण्यासाठी धावला आणि धावत धावत ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात फलाट आणि रेल्वेच्या मध्ये पाय घसरून पडला आणि अडकला. हे दृश्य पाहून इतर प्रवाशी घाबरले आणि गोंधळून गेले. या तरुणाला ट्रेनच्या मध्ये अडकलेलं पाहून आरपीएफ जवान भागवत बाजड हे देवासारखे आले आणि त्यांनी तातडीने आपल्या जीवाची पर्वा न करता या तरुणाला आपल्या दिशेने ओढले आणि त्याचे प्राण वाचवले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून. भागवत बाजड यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.    

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानमोदींना प्रत्युत्तर म्हणाले -

पाकिस्ताच्या सीमेवर दहशतवादी हल्ला, पाच इराणी सुरक्षा जवान शहीद

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

मेक्सिकोमध्ये बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात 10 जण ठार

माजी भारतीय पोलो खेळाडू एचएस सोढ़ी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments