Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोलकरणीच्या मुलगा पुढील शिक्षणासाठी जाणार लंडनला

Webdunia
शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (22:01 IST)
सोलापूर जिल्ह्यातील कृर्डुवाडी मधील घरगुती काम करून आपल्या कुटुंबीयांचं उदरनिर्वाह करणाऱ्या एका गरीब महिलेचा मुलगा परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषात बदल केल्यावर लंडन शिकायला जाणार आहे.या साठी त्याने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहे.लोकांच्या घरात काम करणाऱ्या या महिलेचा हुशार मुलगा योगेश बडेकर लंडन मधील इम्पेरिकल कॉलेज मध्ये इन्व्हायर्मेंटल इंजिनियरिंग मध्ये मास्टर्स करण्यासाठी लंडन जात आहे. शिष्यवृत्तीच्या बळावर त्याने आपले शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न घेऊन लंडन पुढील शिक्षणासाठी जात आहे.
 
सामाजिक आणि न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषात काही बदल केल्याने या योजनेचा कोटा प्रथमच पूर्णपणे म्हणजे 100 टक्के भरला. या शिष्यवृत्ती योजने अंतर्गत योगेश बडेकर हा विद्यार्थी लंडन मास्टर्स करण्यासाठी जात आहे.योगेश लहान असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले.3 बहिणी आणि योगेश असा चोघांना त्याच्या आईने लोकांच्या घरात काम करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला. योगेश ने आपल्या कवितेतून धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहे.
 
योगेशची धनंजय मुंडेंसाठी खास कविता
 
'मोलकरणीचा मुलगा निघाला शिकाया आज लंडनला।
नाही लागणार आईला आता दुसऱ्याची घरं झाडायला।।
कारण आपल्या खात्याने पाठवलं मला पुढं शिकायला।
शतशः आभार या आपल्या खाते समाजकल्याणला।।
राहील ऋणी मी सदा या आपल्या कार्याला, या आपल्या कार्याला।।
 
स.न.वि.वी.
महोदय,
 
मी योगेश जनार्धन बडेकर तुम्हास हे आभार पत्र लिहीत आहे. मी आर्थिकदृष्ट्या खूप दुरबिल असून आज पर्यंत सर्व काही आईचा कष्टावर झालं आहे. वडील हे बालपणीच वरल्यामुळे ३ बहिणींच्या लग्नाची आणि माझा शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी माझा आईने कामे करून पूर्ण केली.
 
— Yogesh Badekar (@YogeshBadekar) August 13, 2021

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

कारमध्ये बंद झाल्याने चार मुलांचा गुदमरून मृत्यू

पुण्यात भारतीय हवाई दलाचा अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक

सर्वपक्षीय शिष्टमंडळाला 'वरात' म्हणणाऱ्या संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवारांची टीका

LIVE: 'आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर...', सर्वपक्षीय शिष्टमंडळाला 'बारात' म्हणणाऱ्या संजय राऊतांना शरद पवारांचा सल्ला

महिलांना आकर्षित करण्यासाठी Indian Air Force चा अधिकारी असल्याचा सांगायचा, पुण्यात तोतया जवानाला अटक

पुढील लेख
Show comments