Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोठ्या भावाचा होता लहान भावाच्या बायकोवर डोळा, त्याचा झाला खून

older brother
, शनिवार, 27 जुलै 2019 (09:17 IST)
घरातील नेहमीचे वाद व अनैतिक संबंधाच्या वादातून लहान भावाने चुलत भावाच्या मदतीने आपल्या सख्ख्या मोठ्या भावाचा कुऱ्हाडीने डोक्यात वार करून हत्या केली आहे. सोबतच त्याचा मृतदेह शेतात फेकून दिल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज गावात घडला आहे. नांदगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपी लहान भाऊ, चुलत भावाला अटक केली आहे. मोठ्या भावाचे नाव रफिक शेख असं होते. तर  आरोपी लहान भाऊ तौफिक शेख, आरोपी चुलत भाऊ सलमान शेख यांना अटक केली आहे. मंगळवारी 27 वर्षीय रफिक शेख या तरुणाचा मृतदेह आढळला होता. रफिक मका पिकाला पाणी देण्यासाठी सोमवारी संध्याकाळी गेला होता, सकाळपर्यंत घरीच परतला नाही. त्याचा शोध घेतल्यानंतर गावातील रस्त्यालगत मृतदेह आढळला होता. पोलिसांनी तपास केली असता त्यांना असे समजले की मोठा भाऊ रफिक हा लहान भाऊ तौफिकच्या पत्नीसोबत अनैतिक संबंधाची मागणी करत होता, त्याच रागातूनच ही हत्या केल्याचं तौफिकने सांगितलं.तौफिक आणि सलमानने रफिकच्या डोक्यावर आणि शरीरावर वार केले आणि डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मधुकरराव पिचड यांचे पुत्र राष्ट्रवादीचे आ. वैभव पिचड यांचा भाजप प्रवेश निश्चित