Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परतीच्या पावसाचा तडाखा! शेतीचे नुकसान; या जिल्ह्यांना अलर्ट जारी

Webdunia
बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (21:10 IST)
मुंबई  –जुलै महिन्यापासून सुरू झालेला पाऊस आता परतीच्या मार्गावर आहे. मात्र या परतीच्या पावसानेदेखील जोरदार हजेरी लावली असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पुढील दोन दिवस राज्यभरात सगळीकडेच पाऊस पुन्हा हजेरी लावणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान मध्य भारतातून मान्सूनच्या माघारी परतण्यासाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाकडून बोलले जात आहे. आज (१२ ऑक्टोबर) उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व मराठवाडा वगळता उर्वरित राज्यात विजा, मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याबरोबरच हवामान विभागाने विजांसह पावसाचा काही जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पाऊस असणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापुरात पावसाचा जोर वाढणार आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
 
राज्यभरात पाऊस
औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या मराठवाड्यातील भागांमध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर भागात पावसाचा जोर राहील, हवामान विभागाने माहिती दिली. पोषक हवामानामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे मंगळवारी उन्हाचा चटका काहीसा कमी झाला होता. उत्तर महाराष्ट्र पूर्व मराठवाडा वगळता उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

जम्मू-काश्मीर : किश्तवाडमध्ये चकमकीत एक जवान शहीद

आशियाई महिला हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात, जपान-कोरिया यांच्यात पहिला सामना

महायुतीचा प्रचार जातीयवादी आणि द्वेषपूर्ण, काँग्रेसचा भाजपवर आरोप

काँग्रेसने आजपर्यंत राज्यांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केले नाही-प्रकाश जावडेकर

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

पुढील लेख
Show comments