Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्य सरकारचा चालढकलपणा सुरू आहे, अनिल परब हतबल झाल्याने काहीही बोलतात : पडळकर

The state government's maneuvering is going on
, शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (21:43 IST)
राज्य सरकार  गुरुवारी एसटीचे खासगीकरण करणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र याबाबत राज्य सरकारने अजून अधिकृत घोषणा केली नाही. याबाबत भाजप नेते गोपीचंद पडळकर म्हणाले की, ‘एसटीचे विलीनीकरणाचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारचा चालढकलपणा सुरू आहे. दररोज नव-नवीन स्टेटमेंट दिली जात आहेत. संप मोडीत काढायचा प्रयत्न सुरू आहे. तसेच अनिल परब हतबल झाल्याने काहीही बोलतात,’ असा आरोप पडळकरांनी केला आहे.
 
गोपीचंद पडळकर म्हणाले की, ‘सरकार विलीनीकरण करणार असेल तर किती दिवसात करणार आहात, तसे तुम्ही लेखी लिहू द्या. विलीनीकरण करणार नसाल तर तुमच्याकडे काय पर्याय आहे स्पष्ट करा. दोन बैठका कर्मचाऱ्यांसोबत झाल्या, त्या बैठकांमध्ये विलीनीकरणा व्यतिरिक्त आम्हाला दुसऱ्या विषयी चर्चा करायची नाही. सरकार रोज नवीन काहीतरी पुड्या सोडत आहे, अफावा पसरवत आहे. लोकांच्यामध्ये उद्रेक होईल, संपामध्ये फूट पडेल असा पद्धतीचे प्रयत्न २८ तारखेपासून सुरू आहे. पोलीस बळाचा वापर करणे, एसटी अधिकाऱ्यांचा वापर करणे, यांच्या संघटनांचा दबाव टाकणे, गाड्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे, निलंबनाच्या नोटीसा देणे, सेवा समाप्तीच्या नोटीसा देणे, उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणे सगळे प्रयोग करुन बघितले. परंतु कर्मचारी फुडत नाही हे लक्षात आल्यानंतर काल संध्याकाळी ७ वाजता आमची खासगीकरणावर बैठक सुरू आहे, अशाप्रकारच्या बातम्या ते पसरवल्या. या सगळ्या अफवा आहेत, संप कसा मोडीत काढायचा, असा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे.’

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एसटी चालकाने कमी पगारामुळे केली आत्महत्या