Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्य पुन्हा गारठणार, थंडीचा कडाका वाढणार

The state will freeze again
, शनिवार, 29 जानेवारी 2022 (09:42 IST)
सध्या देशभरात हवामानात सतत बदल होत आहे. काही भागात अजूनही पाऊस सुरु आहे. सध्या देशात थंडीची लाट उसळून येत आहे. आणखीन काही दिवस हवामानात बदल होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस थंडीचा जोर कायम असेल अशी शक्यता आहे.    

राज्यात काही भागात येत्या दोन ते तीन दिवसात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. विदर्भात हवामानात घट होण्याची शक्यता आहे. या काळात देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसेच उत्तर पश्चिम, मध्य भारत, पूर्व भारत आणि मध्यप्रदेशातील काही भागात थंडीची लाट राहील. 

ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 29 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान जम्मू -काश्मीर ,लडाख गिलगिट- बाल्टिस्तान , मुझफ्फराबाद येथे  हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवली आहे.   
 तसेच दुसऱ्या वेस्टर्न डिस्टर्बरन्समुळे 2 -4 फेब्रुवारी दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात काही भागात मुसळधार मेघसरी आणि हिमवर्षाव होऊ शकतो. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.61 टक्के