Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

आरोग्य विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेचा तिसरा टप्प्यास 27 जून पासून प्रारंभ

doctors day
, सोमवार, 26 जून 2023 (20:52 IST)
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रम, रिमेनिंग पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, विद्यापीठाचे अभ्याक्रमांच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेच्या तिसऱ्या टप्प्यास मंगळवार, दि. 27 जून 2023 पासून प्रारंभ होत आहे.
 
राज्यातील विद्यापीठाचे सलंग्नित महाविद्यालयातील एकूण 171 परीक्षाकेंद्रावर दि. 27 जून 2023 ते दि. 09 ऑगस्ट 2023 कालावधीत विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये एम.बी.बी.एस., बी.डी.एस. बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी.एच.एम.एस., बी.एस्सी. नर्सिंग, बेसिक बी.एस्सी नर्सिंग,    बी.पी.टी.एच., बी.ओ.टी.एच., बी.पी.ओ., बी.ए.एस.एल.पी. व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील एम.डी.एस., डिप्लोमा डेन्टेस्ट्री, एम.डी./एम.एस, आयुर्वेदा आणि युनानी, एम.डी. होमिओपॅथी, डिप्लोमा आयुर्वेदा,  एम.ओ.टी.एच., एम.ए.एस.एल.पी., एम.एस्सी. , एम.पी.ओ तसेच बी.पी.एम.टी., एम.पी.एच., एम.बी.ए., एम.फिल., बी. ऑप्टोमेट्री, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, डिप्लोमा ऑप्थॉल्मीक, डिप्लोमा पॅरामेडिकल, पी.जी. डि.एम.एल.टी., सी.सी.एम.पी., एम.एम.एस.पी.सी. या अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. तसेच दि. 29 जून 2023 रोजी होणाऱ्या परीक्षा बकरी ईद (ईद-उल-झुआ) ची सार्वजनिक सुट्टी असल्याने वेळापत्रकानुसार त्या दिवसाच्या सर्व परीक्षा दि. 30 जून 2023 रोजी घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक     डॉ. संदीप कडू यांनी स्पष्ट केले.
याबाबतीत अडचणी किंवा सूचना असल्यास विद्यार्थ्यांनी केंद्र समन्वयक यांच्याशी संपर्क साधावा अथवा विद्यापीठाचे अधिकृत www.muhs.ac.in संकेतस्थळावर परीक्षासंदर्भात माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पानेवाडीतला टँकर ट्रान्सपोर्टरच्या चालकांचा संप मागे, इंधनाचा पुरवठा पूर्ववत