Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा…; देवेंद्र फडणवीसांची भावूक पोस्ट

Webdunia
बुधवार, 28 जून 2023 (21:50 IST)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावच्या दौऱ्यावर होते. जळगावमधल्या दिव्यांग शाळेला देवेंद्र फडणवीसांनी भेट दिली. उपमुख्यमंत्री फडणवीसांना एका दिव्यांग मुलीनं पायानं टिळा लावला. तसंच पायानं ताट धरत त्यांचं औक्षणही केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी संध्याकाळी केलेली एक भावनिक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली.
 
जळगाव दौऱ्यावर असताना एका ठिकाणी घडलेल्या प्रसंगाचा व्हिडीओ देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्वीटबरोबर शेअर केला आहे. या व्हिडीओप्रमाणेच त्यातली युवती देवेंद्र फडणवीसांना पायाच्या अंगठ्याने टिळा लावतानाचा फोटोही तितकाच व्हायरल होत आहे.
 
देवेंद्र फडणवीस मंगळवारी जळगावच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांचं एका युवतीनं औक्षण केल्याचा हा व्हिडीओ आहे. मात्र, व्हिडीओमधील युवती दिव्यांग असून पायांनी औक्षणाचं ताट धरून तिनं फडणवीसांना ओवाळलं. एवढंच नाही, तर तिनं तिच्या उजव्या पायाच्या अंगठ्यानं देवेंद्र फडणवीसांना टिळा लावला. या प्रसंगाचा व्हिडीओ शेअर करताना देवेंद्र फडणवीसांनी भावनिक पोस्ट केली आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांची भावनिक पोस्ट
या व्हिडीओसोबत फडणवीसांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. या प्रसंगी आपलं मन अंतर्बाह्य थरारून गेल्याचं फडणवीसांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
“आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला, पण तो पायाचा… हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याच पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की ‘तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे”, असं फडणवीसांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
“ते सगळं पाहून मी इतकंच म्हणालो, ‘ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत’. या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले – ‘अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला”,
 
असं आपल्या पोस्टच्या शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

अजित पवारांना पीएम मोदींची 'एक है तो सेफ है' ही घोषणा आवडली,'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला विरोध

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi मोदी सरकार वक्फ कायद्यात सुधारणा करणार, अमित शहांची घोषणा

येमेनच्या हुथी बंडखोरांचा अमेरिकन युद्धनौकांवर ड्रोन-क्षेपणास्त्रांनी हल्ला

Maharashtra Elections 2024: मोदी सरकार वक्फ कायद्यात सुधारणा करणार, अमित शहांची घोषणा

उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणी प्रकरणावर भाजपचे प्रत्युत्तर

पुढील लेख
Show comments